WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

युवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

Image

-प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगांव)

तालुक्यातील पांढरकवडा येथील युवा शेतकऱ्यांने स्वतः चे शेतात गळफास घेवून आत्महत्यां केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

विजय प्रभाकर भोयर (वय३२) असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव असून पांढरकवडा शिवारात असलेल्या शेतात झाडाला गळफास लावून जिवन यात्रा संपविली. या परिसरात शेळी, गुरे राखणाऱ्या गुराख्याला ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबातील लोकांना याची माहिती कळविली. दरम्यान आत्महत्या केलेल्या युवकाचे लग्न मागील महिन्यात जुळले होते. टाळेबंदी उडल्यानंतर त्याचा विवाह होणार होता मात्र, त्यापुर्वीच जिवनाचा त्याने शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुर्तास आत्महत्येचे कारण समजले नसून वेगवेगळ्या चर्चै उधाण आले आहे. मृतक विजयाच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले