WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत जुगार खेळताना 11 आरोपींना अटक

Image

पाच लाखाच्या मुद्देमालासह ११ जुगारी वणी पोलिसांच्या ताब्यात........
जुगाराची मोठी कारवाई.........
वणी(रवि ढुमणे)कोविड १९ च्या धर्तीवर गस्तावर असलेल्या वणी पोलिसांनी बेलदारपुरा भागातील एका घरावर धाड टाकून ११ जुगार खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडून चार लाख ७८ हजार सातशे पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोरोना संचारबंदी काळात जुगाराची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचे जगभरात थैमान आहे. जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस जीवाचे रान करीत आहे."बाहेर पडू नका. घरातच थांबा असा संदेश देत फिरत आहेत. मात्र घरातील शौकीन पुरुष वार्डातील एखाद्या घराचा आसरा घेत जुगाराचे खेळ खेळत आहे.
बुधवारी दुपारी चार वाजताचे सुमारास ठाणेदार वैभव जाधव यांना बेलदारपुरा भागातील सतीश जाधव यांचे घरी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. ठाणेदार वैभव जाधव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात व्यवस्थित सापळा रचून डीबी पथकाचे गोपाल जाधव, सुदृशन वानोळे,सुनील खंडागळे,सुधीर पांडे,रत्नपाल मोहाडे,पंकज उंबरकर,दीपक वांड्रसवार अमित पोयाम यांना रवाना केले. प्रसंगी संपूर्ण परिसरातील रस्ते बंद करून सतीश जाधव यांच्या घरी धाड टाकली असता, सतीश मंगल जाधव, ३१, अवि विठ्ठल सोनूले २५,ओमप्रकाश दिलीप मुळे ३१,राहुल केशव नागतुरे ३१,प्रणय अनिल सुतसोनकार, २४,सौरव मधुकर टोंगे २५,देवेंद्र विजय दीकुंडवार २५,राकेश बंडू ढवस, २४,राहुल बंडू रोडे २४,महेंद्र शामदेव खाडे ३३,रुपेश गेवरदास बोढे २८ या अकरा जुगार खेळणारे ,व सात दुचाकी , १३ मोबाईल सह रोख रक्कम ९५ हजार रुपये असा एकूण चार लाख,७८ सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत अकरा जुगारीना ताब्यात घेतले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.