WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वीज पडून शेतमजुर ठार.....

Image

वणी :- सुरज चाटे
वीज पडून मोहदा येथील शेतमजुर ठार.....

शेतातून परत येताना काळाचा घाला :- एकीकडे कोरोना तर दुसरीकडे वरूनराजाचा रोना..

मोहदा सह परिसरात दिनांक 6 ला दुपारच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने वादळवाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला त्यात मोहदा येथील शेतमजूर सुरेश मडावी, अं 50 वर्ष हे वीज पडून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

मोहदा सह परिसरात अवकाळी पावसाने दिनांक 6 ला दुपारी हजेरी लावली परंतु विजेचा कडकडाट व गारपीठासह झालेला पाऊस शेतमजुराला जीवघेणा ठरला आहे सुरेश मडावी हे अं 50 वर्षीय शेतमजूर शेतात कामाकरिता रोजनदारीने गेले होते. शेतीचे कामे करून परत येत असताना अचानक लागलेल्या पावसाने व विजेच्या कडकडाटाने सुरू झालेल्या पावसामुळे ते निंबाच्या झाडाखाली थांबले परंतु अचानक तिथे वीज पडून काळाचा घाला झाला व सुरेश मडावी हे जागीच ठार झाले, त्यामुळे परिसरात सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे. मृत सुरेश मडावी यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले