WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नगर परिषद व हंसराज अहिर यांच्या तर्फे अडीच हजार धान्य किट वाटप

Image

वणी शहर प्रतिनिधी:- *निलेश चौधरी*

येथील नगर परिषद, व माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या संयुक्त विद्यमाने गरजवंतांना देण्यासाठी 2 हजार 500 धान्याच्या किट्स तयार करण्यात आल्या. वणी शहरात वाटप करण्यासाठी आज दि. 23 एप्रिलला आ. संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसीलदार श्याम धनमणे, ठाणेदार वैभव जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारीq संदीपकुमार बोरकर उपस्थित होते.

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाउन असल्यामुळे रोज मजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी विविध सामाजिक संस्थेद्वारा आपापल्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे करीत आहेत. याच श्रुखलेमध्ये नगर परिषद वणी तर्फे पुढाकार घेऊन नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी एक लाख रुपये, नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी दोन दिवसाचे वेतन दिले आहे. त्यातून दोन हजार धान्य किट्स तयार करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी वणी शहरासाठी पाचशे धान्य किट्स दिल्या आहेत. वणी शहरातून नगरसेवकांनी ज्यांच्या जवळ रेशनकार्ड नाही जे खरोखरच गरजवंत असतील त्यांची यादी तयार करून महसूल विभागाला दिली आहे. या तयार केलेल्या यादीप्रमाणे हे अडीच हजार धान्य किट्स वाटप करण्यात येणार आहे. महसूल विभागाला सदर धान्य किट्स हस्तांतरित करतांना गजानन कासावार, मनीष गायकवाड, दिलीप कोरपेनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.