WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आमेर बिल्डर च्या संचालकावर जीवघेणा हल्ला.....

Image

वादाचे कारण गुलदस्त्यात :- मिर्चीपावडर फेकून

क्रिकेटच्या स्टम्पने केला वार.....

वणी: सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

शहरात विविध भागात शांततामय वातावरण असून आज दिनांक 21 ला दुपारच्या दरम्यान शहरातील मोमीनपुरा येथील मस्जिद समोर वणीतील नामांकित जमीर खान (जम्मू) यांच्यावर एकाने क्रिकेट खेळायच्या स्टॅम्पने हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रकार केला असल्याची घटना घडली आहे.

सध्या कोरोना सारखा जीवघेणा संसर्ग जन्य आजार सुरू असून वणीसह परिसर शांत मय वातावरणात असून मात्र आज दिनांक 21 ला दुपारच्या दरम्यान आमेर बिल्डरचे संचालक जमीर खान उर्फ जम्मू (39) दुपारी मित्र सैय्यद आरिफ सोबत मोमीनपुरा येथे घरी जात होते. यावेळी अब्दुल मजीद अब्दुल सत्तार (30) रा. वणी याने अचानक दुचाकी क्रमांक MH29 BB4053 या वाहनवरून येऊन गाडीने जमीर याची अडवणूक करीत मिर्ची पावडर चेहऱ्यावर फेकले. परंतु डोळ्यावर चष्मा असल्याने ते पावडर काहीच प्रमाणात गेले, सोबत असलेल्या मित्राच्या डोळ्यात सुद्धा मिरची पावडर गेले, डोळे बंद असतांना क्रिकेटच्या लाकडी स्टंपने उजव्या हाताच्या कोपऱ्यावर व सैय्यद यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. सदर इसमाचा कट हा जीवे मारण्याचा असल्याचे जमीर खान यांचे म्हणणे आहे.

या हल्याने एकच खळबळ उडाली असून मात्र याचे कारण अद्याप स्पष्ट नसून नेमका कशामुळे हा प्रकार घडला हे मात्र कोडेच आहे? त्यामुळे वार्डात एकच गर्दी झाली होती. आरोपी घटनास्थळाहुन पळ काढण्यास यशस्वी झाला असून यामुळे वनीशहारात एकच खळबळ उडाली होती, तसेच आरोपी अब्दुल याच्यावर कलम 341, 324, 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जमीर खान यास उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वृत्त लिहितपर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले