WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वीज पडून कोठा जळून खाक....

Image

अंदाजे दीड लाखाचे नुकसान :- अस्मानी संकटाने शेतकरी चिंतातुर..

वणी :- सुरज चाटे, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

झरी तालुक्यातील चीचघाट येथील शेतकऱ्याचे खडकडोह येथिल कोठ्यात दिनांक 18 च्या मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात विजेचा कडकडाट झाला त्यात चीचघाट येथे कोठ्यावर वीज पडून आगीत दिड लाखाचे नुकसान झाले आहे.

झरी तालुक्यातील चीचघाट येथील शेतकरी विनोद माधवराव झाडे यांच्या मालकीच्या खडकडोह येथील शेतीच्या कोठयावर दिनांक 18 च्या मध्यरात्री वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून लागलेल्या आगीत कुटार, फवारणी पंप, सर्व्हिस केबल, पाणबुडी मोटार, वखर, टिपण, सागवान फाटे, पलंग जळून खाक झाले त्यामुळे एकूण अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.