WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संचारबंदीचे उल्लंघन करणार्या 11 लोकांवर कार्यवाहीचा बडगा

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

कोरोना विषाणु प्रतीबंध व नियंञन संबंधाने मा.जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचे आदेशाने जिल्ह्यात संचारबंदी लागु असतांना सदर संचारबंदी दरम्यान आदेशाचे पालन न केलेल्या व दुकानदारांनी ग्राहकांमध्ये सामायीक अंतर न ठेवणे बाबत व्यवस्था न करणार्या एकुन 11 आरोपी विरुद्ध कलम 269,188 भादंवी नुसार पो.स्टे वणी येथे गुन्हे नोंद करण्यात येवुन न्यायालयात दोषारोप पञ दाखल करण्यात आले होते.आज दि.16 एप्रिल रोजी मा.न्यायाधिष श्री के.के.चाफले प्रथम वर्ग न्यायालय वणी यांनी सदर गुन्ह्यातील 11 आरोपिंना प्रत्येकी 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवसाची कारावासाची सजा सुनावली आहे. विशेष म्हणजे सात दिवसापुर्वीच संचारबंदीचे उल्लंघन करणार्या 20 जनांना वणी न्यायालयाने सजा सुनावली होती. शिक्षा होत असल्यामुळे माञ नियम तोडणार्यांचे चांगलेच धाबे दनानले आहे.

सदरची कारवाई मा. एम राजकुमार पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा नुरुल हसन अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ,पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक वणी, मा. वैभव जाधव पोलीस निरिक्षक वणी यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/गोपाल जाधव,पोहवा/ सुदर्शन वानोळे,अशोक टेकाडे,सुनिल खंडागळे,सुधिर पांडे, रत्नपाल मोहाडे,पंकज उंबरकर,अमित पोयाम ल न.प.चे आरोग्य निरीक्षक यांचे पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले