WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आता परिणाम भोगायला तयार राहा, डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला थेट धमकी

Image

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कोरोना व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटना(WHO) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीननं वारंवार फसवणूक केली आहे. चीननं या व्हायरससंदर्भात चुकीची माहिती दिल्यानंतर त्याचे पूर्ण जगाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. चीनच्या वुहान शहरातूनच या व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे, याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

व्हाइट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसंदर्भात काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना त्यांनी चीनला थेट धमकीच देऊन टाकली आहे. चीनविरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच, परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही, पण त्यांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं, à¤…संही पत्रकाराला उद्देशून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.  

रिपब्लिकन खासदारांची चीनविरोधात कारवाईची मागणी
सिनेटर स्टिव्ह डेन्सने यांनी ट्रम्प यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. अमेरिकेनं चीनवर वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणांसाठी अवलंबून राहणं संपुष्टात आणलं पाहिजे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तत्पूर्वी ट्रम्प यांनी चीननं जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ)च्या माध्यमातून अमेरिकेचा फायदा उचलल्याचा आरोप केला होता. चीन निष्पक्षपणे वागला नाही, तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा अमेरिकेनं दिली आहे. चीन 30 वर्षांपासून अमेरिकेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.  

चीनवर ट्रम्प यांचा हल्लाबोल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी à¤šà¥€à¤¨à¤µà¤° सतत कोरोना व्हायरसच्या संबंधीची माहिती लपवल्याचा आरोप केलेला आहे. या विषाणूसंदर्भात चीननं प्रारंभिक माहिती लपवल्यानं त्याचा जगाला परिणाम भोगावा लागत आहे. कोरोना व्हायरस हा चिनी व्हायरस असून, जग त्यांच्या चीनच्या कर्मांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगतो आहे. वेळेत माहिती दिली असती तर कोरोनाला चीनमध्येच रोखता आलं असतं, असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. 
 

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले