WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रक्तदान करूया,कोरोना ला हरवू या.......वणी व्यापारी असोसिएशन द्वारे भव्य रक्दान शिबिराचे आयोजन

Image

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

सध्या स्थितित कोरोनाचा कहर जगभरात सुरू असुन रक्तपेढ्यातील रक्तसाठा आता सम्पूष्ठात आला असून अशा आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशन वणी तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून मोठ्याप्रमाणात रक्तदात्यानी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

व्यापारी असोसिएशन वणी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन वणी येथील राम मंदिर (पंजाबी) खाती चौक येथे दिनांक 11 ला, सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत करण्यात येत असून कोरोना सारखा जीवघेणा आजार लक्षात घेता व रक्ताची कमतरता पाहता व्यापारी असोसिएशन ने या काळात महत्वपूर्ण शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेशभाऊ खुराणा, उपाध्यक्ष राजू गुंडावार, सचिव अनिल आक्केवार, कोषाध्यक्ष लवलेश लाल, सहसचिव संजय पांडे, कार्यकारिणी सदस्य किशन खुंगर,रमेश येरने,रवि निखार,दीपक छाजेड,भगवान तारुणा,अनुज मुकेवार व समस्त व्यापारी असोसिएशन वणी च्य सदस्य गणांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले