WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवनी धोबे येथे अजगराला सर्प मित्राकडून जीवदान

Image

•अजगराला जीवनदान दिल्याने सर्पमित्र सुशिल शिरसाट व शेषराव भोयर सुरज नागभीडकर यांचे सर्वत्र कौतुक...!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव-यवतमाळ)

मारेगांव तालुक्यातील शिवनी धोबे या गावात भलामोठा अजगर आढळून आल्याने गावकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सर्पमित्र सुशिल शिरसाट व शेषराव भोयर, सुरज नागभीडकर रा.वरोरा यांना फोनवर माहिती दिली माहिती मिळाल्यानंतर दुचाकीने शिवनी धोबे हे गांव गाठुन तात्काळ घटनास्थळ पोचले व त्या अजगराला पकडून जीवदान दिले. दहा फूट सोळा किलो वजनाच्या या अजगराला वनविभागा कडे देण्यात आले. मारेगाव तालुक्यातील फिस्की(मच्छिन्द्रा) जंगलात सोडून देण्यात आले आहे. अजगराला जीवनदान दिल्याने सर्पमित्र सुशिल शिरसाट व शेषराव भोयर, सुरज नागभिडकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले