WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सावधान…! ...नियम तोडणार्यास मिळणार दांडुचा प्रसाद ...दांडु लागे दन दन.... शिस्त येई छन छन...

Image

 वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांबाबत मवाळ भूमिका घेतलेल्या पोलिसांवर अखेर दांडु हातात घ्यायची वेळ आली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही विनाकारण घराबाहेर पडणा-यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत....! आज बाहेर निघालेल्या अनेकांना पोलिसांच्या दांडुचा प्रसाद मिळाल्याची माहिती आहे. टिळक चौक, तहसिल चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक इ. ठिकाणी अनेक बाईक चालकांवर पोलिसांच्या दांडुचा प्रसाद खाण्याची वेळ आली.

कोरोनामुळे सध्या संचारबंदी सुरू आहे. त्यात जिवनावश्यक वस्तू घेण्यासाठी तसेच अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघण्याची सशर्त परवानगी प्रशासनाकडून मिळाली आहे. परंतू काही निर्लज्ज फक्त फेरफटका बाहेर निघतांना दिसत आहे. रविवारी 29 मार्च रोजी लोकांनी भाजी मंडई व जत्रा मैदानात अक्षरश: धिंगाणा घालत संचारबंदी व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.

रविवारी संध्याकाळी पोलिसांनी बाईकने अनावश्यक फिरणा-यांवर कारवाई केली. यात त्यांनी सुमारे 60 वाहनं जप्त केले. मात्र त्यानंतरही लोकांचे अनावश्यक बाहेर पडणे कमी झाले नव्हते. अखेर पोलीस प्रशासनाचा संयमाची परिक्षा संपली व त्यांनी कठोर भूमिका घेत अनेकांबाबत ‘दांडुका प्रसाद ’ ला सुरुवात केली. आज दुपारपर्यंत काहींना पोलिसांचा प्रसाद मिळाल्याची माहिती देशोन्नतीला मिळाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.