WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पुण्यात पाच, मुंबईत तीन नवे करोनाग्रस्त; महाराष्ट्राचा आकडा २१५.

Image

आर्थिक आघाडीवर दोन हात करणाऱ्या भारतासमोर करोनानं वेढा देत मोठं आव्हान उभं केलं आहे. करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढायला लागल्यानंतर आधी महाराष्ट्र सरकारनं, तर नंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केलं. आठवडाभरापासून देश घरातच वावरतो आहे. पण, सुरक्षित राहायचं असेल तर घरातच बसा, असं सांगणारी आकडेवारी समोर येत आहे. राजधानी दिल्लीत रविवारी म्हणजे एकाच २३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू झाला. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले