WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत १५ जणांच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’ चा शिक्का

Image

सोमवारपर्यंत वणीत परतलेले २४८ लोक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून त्यांपैकी परदेशातून वणीत परतलेल्या १५ जणांच्या हातांवर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत आहेत. यात परदेशातून परत आलेल्यांचाही समावेश आहे. यांपैकी कुणाला कोरोनाची बाधा झाली तर नाही ना, याची चाचपणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.

होम क्वारंटाइनचा कालावधी आता, १४ दिवसांवरून २१ दिवस करण्यात आला आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात रविवारपर्यंत ११८ लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने त्यांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share