WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Coronavirus: करोनाग्रस्तांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार

Image

महाराष्ट्रात २६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांपाठोपाठ मॉल्सही बंद राहणार आहेत असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे. करोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारच करणार आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ज्या रुग्णांमध्ये सुधारणा होते आहे त्यांना घरी सोडण्यात येईल. कुठेही गर्दी होऊ नये म्हणून आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ३० मार्चपर्यंत मॉल्स बंद राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गर्दी टाळण्यासाठी मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन आणि बस-सेवा अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. अनावश्यक प्रवास टाळा असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. ‘वर्क फ्रॉम होम’ ज्या कंपन्यांना शक्य आहे ते त्यांनी अंमलात आणावं असंही निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. चित्रपटगृहं किंवा मॉल्स सुरु ठेवले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही सुरु राहतील, मात्र अनावश्यक गर्दी, प्रवास टाळावा. योग्य ती खबरदारी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

करोनाची लागण झालेल्या दोघांचे मृत्यू देशात झाले. त्यामुळे करोना हे राष्ट्रीय संकट म्हणून केंद्राने जाहीर केलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदतही जाहीर केली आहे. आता राज्य सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून करोनाग्रस्तांचा सगळा खर्च उचलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात एकूण २६ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स १५ दिवस तर शाळा आणि महाविद्यालयं ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.