WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आई-वडिलांच्या भांडणात मुलीचा मृत्यू

Image

हिंगोली : आई-वडिलांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीच्या डोक्यात लोखंडी गजाचा मार बसल्याने तिचा मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली. सेनगाव तालुक्यातील सवना येथे बुधवारी पहाटे ही घटना घडली. वैष्णवी विनोद भालेराव असे मृत मुलीचे तर रत्नमाला भालेराव असे जखमी आईचे नाव आहे.

सवना येथील विनोद भालेराव याचा त्याची पत्नी रत्नमालाशी मंगळवारी रात्री झालेला वाद विकोपाला गेला. यामध्ये विनोदने रागाच्या भरात लोखंडी गजाने रत्नमालाच्या डोक्यात वार केला. मात्र, त्यांच्या तोंडावर वार लागला. त्यामध्ये त्यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून वैष्णवी हिला जागी आली. तिने आई-वडिलांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागात असलेल्या विनोदने वैष्णवीच्याही डोक्यात लोखंडी गजाचा वार केला. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते पाहून घाबरलेल्या विनोदने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला उपचारासाठी सवना येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैष्णवीला मृत घोषित केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.